सोलापुर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्यावतीने माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

    पंढरपूर,२०/११/२०२०- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील इंदिरानगर आवारातील माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी late prime minister indira gandhi यांच्या पुतळ्यास सोलापूर जिल्हा काँग्रेस ओबीसी अध्यक्ष समिर कोळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोपाळपूर येथील मा.सरपंच शिवाजी आसबे होते.

  अध्यक्षीय भाषणात गोपाळपूरचे मा.सरपंच शिवाजी आसबे म्हणाले, स्व.इंदिराजी गांधी यांचा आदर्श सर्व महिलांनी घ्यावा, बीजेपी सरकार हे लबाडाचे सरकार आहे,काँग्रेस का हात,सब के साथ .

   इंदिरानगर,गोपाळपूर येथील काँग्रेसचे जेष्ठ नेते मंगेश कुलकर्णी,पंढरपूर शहराध्यक्ष राजेश भादूले, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष अशपाक सय्यद, ब्राम्हण सेल जिल्हाध्यक्ष द.बडवे , ग्रामपंचायत सदस्य सागर पवार यांनी स्व.इंदिरा गांधी यांच्या आठवणींना उजाळा देत गौरवपर मत व्यक्त केले.

    आभार मा.शहराध्यक्ष सुहास भाळवणकर यांनी मानले.या कार्यक्रमासाठी दत्ता झरकर,अभिषेक शहा,मिलिंद अढवळकर, अमोल वाडेकर,सौ. बागेवाडीकर, अन्सार काझी, बाळासाहेब आसबे, दीपक येळे व सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते , इंदिरानगर येथील सर्व रहिवासी महिला उपस्थित होते.
 
Top