कुर्डुवाडी रेल्वे कारखान प्रकल्प मुद्दा आपण संसदेत तीन वेळा मांडला - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

कुर्डुवाडी रेल्वे कारखाना ५११ नविन कामगार भरती

      कुर्डुवाडी,(राहुल धोका),०४/११/२०२०- खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वे वर्कशॉपला ५११ नविन कामगार भरती आदेशानंतर भेट दिली .कुर्डुवाडी रेल्वे कारखाना येथे ५११ नविन कामगार भरती होणार असून त्यांनी यासाठी पाठ पुरावा केला होता.येथील‌ सर्व कामाचा आढावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेतली.  

    यावेळी त्यांनी केलेल्या अनेक कामाविषयी माहिती दिली. जेऊर येथे कमी अंतरावरील विद्यार्थी यांना पास देणे, अंडर ग्राऊंड पुलाखाली जमा होणारे पाणी निचरा करणे अदि समस्या सोडवल्याचे सांगितले.कुर्डुवाडी रेल्वे प्रकल्पा साठी स्थानिक रेल्वे कृती समितीचे सदस्य महेंद्र जगताप,राज ढेरे, हरिष भराटे यांनी दिल्ली येथे त्यांची भेट घेऊन  निवेदन दिले होते.कुर्डुवाडी रेल्वे कारखान प्रकल्प  मुद्दा आपण संसदेत तीन वेळा मांडला असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले .

  माजी भाजप शहराध्यक्ष अजित परबत आणि पत्रकारांनी यावेळी ९१७ मिळकत सत्ता प्रकार अ मध्ये वर्ग करणे, कुर्डुवाडी येथे ट्रामा केअर सेंटर मंजूर असूनही याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे तसेच चिंक हिल येथे आरपीएफ सेन्टर स्थालांतर झाले असून त्याठिकाणी बोगी दुरुस्ती व निर्माण कारखाना,सर्व एक्सप्रेस गाड्यांना कुर्डुवाडी येथे थांबा दिला जावा, मुंबई विजापूर रेल्वे रोज सुरू करणे,कुर्डुवाडी येथील बंद पडलेले रेल्वे हायस्कूल चालू करणे, कुर्डुवाडी येथे गार्ड ड्राइवर लॉबीचे स्थालांतर सुरू होणार असुन ते थांबवणे, LBH कोचचे काम कुर्डुवाडी वर्कशॉपला उपलब्ध करून देणे,शहरात रेल्वे गेट मुळे दोन भाग झाले असून उड्डाण पुल निर्माण करणे अशा समस्या मांडल्या.

पत्रकार परिषदेतूनच जिल्हास्तर अधिकाऱ्यांशी संपर्क

        या वेळेस खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सकारत्मक भुमिका घेत पत्रकार परिषदेतूनच जिल्हास्तर अधिकाऱ्यांशी संपर्क करुन प्रश्न सोडवण्याबाबत सांगितले त्याचप्रमाणे वरिष्ट पातळीवरुनही समस्या सोडवण्याची ग्वाही दिली . 

   याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, तालुकाध्यक्ष माढा योगेश बोबडे,पश्चिम महाराष्ट्र उद्योग आघाडीचे उपाध्यक्ष सुहास शहा ,जेष्ठ भाजप नेते गोविंद आबा कुलकर्णी,करमाळा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, युवा नेते उमेश पाटील, सुधीर गाडेकर,दत्त जाधव,तात्यासाहेब गोडगे, विजय कोकाटे,जयसिंग ढवळे,योगेश पाटील, महादेव बागल आदि भाजप पदाधिकारी उपस्थित होते .


   कुर्डुवाडी शहराच्यावतीने खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा शाल श्रीफळ हार घालून सत्कार करण्यात आला.
 
Top