कुर्डुवाडी रेल्वे कारखाना जनसामन्यांचा लढा यशस्वी ५११ नविन कामगार होणार भरती

कारखान बचाव कृती समितीच्या माध्यमातुन उभारले आंदोलन

कुर्डुवाडी,(राहुल धोका)- कुर्डुवाडी शहरातील रेल्वे कारखाना बंद होवू नये यासाठी मोठे आंदोलन शहर नागरिकांनी कारखान बचाव कृती समितीच्या माध्यमातुन उभारले. आगरचंद धोका,डाॅ विलास मेहता,महेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन तीव्र स्वरुप होत रेल्वे रोकोपर्यंत झाले.कुर्डुवाडी शहर,व्यापारी व कामगार युनियन यांनी एकत्र उभा केलेल्या लढ्यास मोठे यश आले असून या प्रकल्पासाठी द्रोणागीरी अनंत हातांनी उचलला आहे .

कुर्डुवाडी शहरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे व अधिक काळ चाललेले हे आंदोलन

    शहरात प्रथम १९९४ ला रेल्वे कारखाना बंद पडणार असे वातावरण तयार झाले.कारखाना बंद करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असल्याचे वाटत होते.कर्मचारी हळूहळू कमी केले जावू लागले पण त्याच्या विरोधात लढयास सुरवात झाली.सर्व पक्षांचा यात सहभाग असलेला हा लढा कुर्डुवाडी शहरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे व अधिक काळ चाललेले हे आंदोलन होते.


      खा.शरद पवार,आमदार रणजीत मोहिते पाटील,आमदार बबनदादा शिंदे ,विनायकराव पाटील,धनंजय डिकोळे,माजी खासदार चंद्रकांत खैरे ,सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलें,केंद्रीय माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर , नामदेव ढसाळ,श्री.जगताप यांचेसह अनेक राजकिय नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या आंदोलनासाठी मोठे योगदान दिले आहे  .

    २८-२-२००८ रोजी गांधी चौक येथे १०० कोटीच्या या प्रकल्पासाठी मोठे धरणे आंदोलन केले गेले.शहरातील रेल्वे कारखाना हाच शहराचे उर्जा स्थान असल्याने यास प्रचंड प्रतिसाद मिळाला.


कुर्डुवाडी शहरात नागरिकांनी अनेक मोर्चे,केंद्रीय मंत्री मंडळाच्या भेटींसाठी दिल्ली वारी,पत्र मोहिम अशी वेगवेगळी अनेक आंदोलन यासाठी उभी करण्यात आली होती.

कुर्डुवाडी शहरावासी यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचावा यासाठी अखेर रेल्वे रोको आंदोलन ही करण्यात आले.के.के एक्सप्रेस अडवण्यासाठी स्वतः केंद्रीय मंत्री रामदास आठवले कुर्डुवाडी शहरात आले होते.त्यांचे रेल्वे कारखाना बंद होवू नये यासाठी मोठे योगदान आहे.

रेल्वे रोकोनंतर मात्र कारखाना कृती समितीचे अध्यक्ष आगरचंद धोका व स्व पद्माकर काशिद यांच्यावर करवाई म्हणून त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक करुन त्यांच्यावर खटलासुध्दा चालवला. दंडात्मक करावाई करुन त्यांना सोडले गेले.

    कुर्डुवाडी शहरातील अनेक कर्मचारी संघटनाचे योगदान यासाठी आहे. महेंद्र जगताप आज ही प्रत्येक अर्थ संकल्पात रेल्वे कारखाना बंद होवू नये यासाठी दिल्ली वारी करतात याचाही परिणाम झालेला दिसून येतो आहे.कुर्डुवाडी एल एच बी बोगी कोचेस निर्मीतीसाठी त्यांचे प्रयत्न चालु आहेत .१९८१ नंतर ही भरती होत असल्याने नागरिक व्यापारी,रेल्वे कर्मचारी यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
तत्कालीन खासदार रणजीत मोहिते पाटिल यांनी हा विषय संसदेत मांडला होता.खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आदिंनी हा मुद्द उचलून धरला होता.

कुर्डुवाडी शहरातील पत्रकार निवास बागडे,सुरेश शहा,विनायक पाटील,स्व इरफान शेख,अशोक खारे,महेश वाळुजकर,विनायक दिक्षित,उल्हास पाटील,विजयकुमार कन्हेरे यांनी हा विषय सतत प्रसिद्धी माध्यमातून उचलून धरत त्याला न्याय दिला आहे.

   कुर्डुवाडी शहराचा ऐतिहासिक वारसा म्हणुन ओळखला जाणारा व भावी पिढीस सदैव उर्जा देणारा हा इतिहास घडला. यात अनेक ज्ञात अज्ञात लोकांनी सहभाग नोंदविला आहे.प्रत्येकाचे नावे घेणे शक्य नसले तरी यासाठी कुर्डुवाडीकर जनतेने केलेल्या मोठ्या लढ्यास यश आले हे सत्य आहे .
 
Top