पेन्शनधारक‌ कर्मचाऱ्यांना तंगीचा सामना करावा लागतोय कुर्डुवाडी,(राहुल धोका),१५/११/२०२०- कुर्डुवाडी नगरपरिषद पेन्शनर कर्मचाऱ्यांना दिवाळी अनुदानाचा फरक मागणी करूनही मिळाला नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे .दिवाळी सणात ९६ पेन्शनधारक‌ कर्मचाऱ्यांना तंगीचा सामना करावा लागत असून आपल्या हक्काची रक्कम मिळावी यासाठी‌ विनंती करत नेत्यांचे उंबरे झिजवत आहेत.

    कुर्डुवाडी नगरपरिषदेत कर्मचारी व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या पगारी थकीत राहण्याचाच नपाचा इतिहास आहे.अशा वेळी स्वतःचा खर्च भागवण्या साठी व्याजावरती तसेच उधारीवरती सण साजरा करण्यासाठी दारोदारी कर्मचारी फिरताना आढळून येत आहेत.
कर्मचारीवर्गास दिवाळी अनुदान मिळावे अशी त्यांची मागणी आहे शासनाकडून पैसे आले नाहीत असे सांगितले जाते , ते पटत नाही विकास कामा साठी ५ कोटी फंड येतो तर मग कर्मचारीवर्गासही दिपवाळी अनुदान भेटलेच पाहिजे.
डाॅ विलास मेहता
    अरुण खवळे,भिका कांबळेंसह अनेक कर्मचाऱ्यांनी आज प्रत्यक्ष प्रतिनिधीकडे येवून व्यथा मांडली आहे . त्यांच्या व्यथा हृदयद्रावक‌ असून संबधित प्रकारची संपुर्ण चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात येत आहे .
कुर्डुवाडी शहराची‌ आम्ही प्रामाणीकपणे सेवा केली आहे . अनेक वेळा आम्ही जीवाची पर्वा न करता काम केले पण रिटायरमेंटनंतर आम्हाला हक्क मागायची वेळ आली आहे.आमची हात जोडून नम्र विनंती आहे आम्हाल वेतन आयोगाचा फरक मिळावा
सतिश मराळ (रिटायर नपा कर्मचारी)
 
Top