कुर्डुवाडी भिगवण रेल्वे विद्युतीकरणाचे उदघाटन
याप्रसंगी संपुर्ण रेल्वे स्टेशन सजवण्यात आले होते.विधिवत पुजा करुन त्याचे उदघाटन व पाहणीसाठी डीआरएम शैलेश गुप्ता,प्रविण वंझारे वरिष्ट मंडल परिचालन प्रबंधक,ए के जैन कमिशनर रेल्वे संरक्षण सेंटर सर्कल,आर.डी.चौधरी,आर.एस. भानवसे,जावेद सर आदि अधिकारी उपस्थिति होते.
कुर्डुवाडी ते भिगवण ७९ किमीचे रेल्वे विद्युतीकरण झाले असून या विद्युतीकरणामुळे मुंबई ते कुर्डुवाडी या लाईनचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.
विद्युतीकरणामुळे २०% खर्च कपात होत असुन डिझेलची बचत होणार आहे. देशातुन डिझेल साठी जाणाऱ्या परकिय चलनात बचत होणार आहे . प्रदुषणाच्या प्रमाणात ही घट होणार आहे.
या विद्युतीकरणाच्या निरीक्षणासाठी कुर्डुवाडी ते भिगवण असा प्रवास रेल्वे अधिकारी यांनी केला. तसेच भिगवणवरुन जलदगतीने कुर्डुवाडीपर्यंत विद्युतकरणाची ट्रायल होणार आहे. विद्युतीकरणा साठी २६ रेल्वे कर्मचार्यांना विशेष प्रशिक्षण दिले गेले आहे .
यावेळी स्थानिक रेल्वे समितीचे सामाजिक कार्यकर्ता राहुल धोका,पत्रकार श्रीनिवास बागडे, हरिष भराटे,अमोल कुलकर्णी यांनी शैलेश गुप्ता डिएमआर व पदाधिकारी यांचे स्वागत केले.