यामुळे वाहतुकीत खर्च खूप कमी

   जेऊर,(करमाळा)- शेतकऱ्यांच्या उत्पादीत शेतीमालास भारतीय रेल्वेद्वारा ५० टक्के सवलतीत किसान रेल्वे सुरू केली आहे ,यामुळे दिल्ली,पाटणा,कोलकत्ता,बेंगळुरू येथे मार्केटिंग सुलभ होईल,तेंव्हा शेतकऱ्यांनी पुढे येऊन लाभ घेतला पाहिजे.यामुळे वाहतुकीत खर्च खूप कमी होतो आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे"असे सूचक उदगार सोलापूर विभागाचे सहा.वाणिज्य व्यस्थापक डॉ.रामदास भुसे यांनी लोक विकास संस्था ,जेऊर भेटीत मार्गदर्शन करताना काढले .

  कृषीरत्न आनंद कोठडीया यांनी स्वागत करताना रेल्वेने उचलले पाऊल अत्यंत महत्वाचे आहे तथापी बचत होणाऱ्या प्रति किलो चार रुपये पैकी किमान एक ते दोन रु.प्रति किलो शेतकऱ्यांच्या खिशात गेले पाहिजे तरच हेतू सफल होईल असे सांगितले.

    पुढे बोलतांना सहा.वाणिज्य व्यस्थापक डॉ. रामदास भुसे यांनी सूचित केले की जेऊर येथे सर्व सोयी उपलब्ध केल्या जातील.

   केळी उत्पादक व निर्यातदार किरण डोके ,श्री. बसाळे वकील यांनी अपेक्षित सवलतीबाबत चर्चेत भाग घेतला .

  रेल्वे वाहतुकी संदर्भात कंदर येथील किरण डोके, शेटफळ नागोबा येथील गजेंद्र पोळ व जेऊर येथील स्टेशन मास्तर श्री.सिंग सर यांचेकडे विस्तृतपणे मार्गदर्शन मिळेल,तेंव्हा अधिकाधिक शेतकरी यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.यावेळी श्री.मोरे,श्री.लक्ष्मी हे रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
 
Top