श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने कार्तिकी यात्रेसाठी श्रींचा पलंग काढला


पंढरपूर,१९/११/२०२० - कार्तिकी यात्रा दि १६/११/२०२० ते दि ३०/११/२०२० या कालावधीत संपन्न होत आहे. दरवर्षी कार्तिकी यात्रेला होणारी गर्दी लक्षात घेता,यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार आज गुरुवार दि १९/११/२०२० रोजी सकाळी ११.५५ वाजता परंपरेनुसार श्रींचा पलंग काढण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून श्रीची काकडा आरती,पोषाख,धुपारती,शेजारती इ.राजोपचार बंद राहतील.मात्र नित्यपूजा, महानैवेद्य व गंधाक्षता एवढेच राजोपचार सुरु राहणार आहेत .

   श्रींचा पलंग काढल्याने विविध संकेतस्थळावर (www.vitthalrukminimandir.org, मोबाईल अँप - श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान, पंढरपूर व जिओ टीव्ही,Tata Sky Dish Tv) उपलब्ध असलेले श्रीचे दर्शन २४ तास सुरू राहील.मात्र राज्य शासनाने नुकत्याच दि १४/११/ २०२० रोजी दिलेल्या आदेशानुसार श्रीचे मुखदर्शन कार्तिकी यात्रा कालावधीत कोणत्या दिवशी व वेळी उपलब्ध राहील, यांची नव्याने सूचना मंदिर समितीकडून देण्यात येईल अशी माहिती विठ्ठल जोशी,कार्यकारी अधिकारी,श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यांनी दिली आहे.
 
Top