पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाहीरनामा

 सोलापूर,२१/११/२०२०-कार्तिक वारी 2020 च्या अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्यावतीने जनतेला केले आवाहन कोवीड-१९ covid-19 च्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे दि २२/११/२०२० ते ३०/११/२०२ दरम्यान मर्यादित स्वरूपात कार्तिक वारी संपन्न होत आहे .यावर्षी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव असून पुणे शिक्षक व पदवीधर मतदार संघ पुणे विभाग 2020 या निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता लागू आहे . त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विधी न्याय विभाग गाणे २०/११/२०२० अन्वये शासन निर्णयाप्रमाणे कार्तिक वारी कालावधीत पंढरपूर शहरात बाहेरील राज्यातून तसेच महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्या तून दिंडी येण्यास बंदी घातलेले आहे. याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व सर्व पोलीस यांना खबरदारी घेण्याबाबत शासनाकडून योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भाविकांनी कोणत्या प्रकारे पंढरपूर शहरांमध्ये प्रवेश करू नये याकरिता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २२ नोव्हेंबर २०२० रोजी पासून ते दिनांक ३०/११/२०२० रोजी बारा वाजेपर्यंत जाहीरनाम्या तील नमूद पॉईंटवरून जड वाहतूक, दिंडी बंद करण्यात आली आहे. कार्तिक वारी कालावधीत कोणत्याही वाहनांना पंढरपूर शहरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही परंतु नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या पंढरपूर आगारात येणाऱ्या बसेसला प्रवेश देण्यात येईल. दि २५ नोव्हेंबर व २६ नोव्हेंबर २०२० रोजी बसमध्ये प्रवासी म्हणून कोणीही वारकरी येणार नाहीत .सदर काळात पंढरपूर शहरात काही नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी येणे असल्यास त्यांनी शक्यतो नमूद कालावधीमध्ये पंढरपूर शहरात देण्याचे टाळावे.अत्यावश्यक काम असल्यास शक्य असेल तर दि.२५ नोव्हेंबर २०२० पूर्वी व दि.२६/११/२०२० नंतर करावे करावे.सदर कालावधीमध्ये पंढरपूर शहरात उपस्थित असणाऱ्या नागरिकांना पंढरपूर सोलापूर ग्रामीण पोलीस दलाकडून काही सूचना देण्यात आले आहेत.

   बसमधून प्रवास करुन पंढरपूर शहरात आलेल्या नागरिकांनी विनाकारण एकत्र जमू नये.विनाकारण शहरात संचार करू नये.पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये. पंढरपूर शहरातील मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी बाहेरच्या कोणालाही यादरम्यान काळात घरात बोलू नये. पंढरपूर शहराबाहेर लावण्यात आलेल्या नाकाबंदी मधून वाहने, पादचारी दिंडी यांना पंढरपूर शहरात प्रवेश करता येणार नाही असे पत्र सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिलेले आहे.
 
Top