पंढरपूर, प्रतिनिधी -पंढरपूर तालुक्यातील श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन तसेच विठ्ठल हॉस्पिटलचे संस्थापक माजी आमदार स्व.औदुंबर आण्णा पाटील यांची ९७ वी जयंती विठ्ठल हॉस्पिटल येथे संपन्न झाली.

   कर्मवीर स्व.औदुंबर आण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब पाटील (देगावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न झाली. यावेळी विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील, उपाध्यक्ष विलास साळुंखे, विठ्ठल हॉस्पिटलचे सर्व संचालक, अ‍ॅड.भारत भोसले, हरीदास घाडगे, प्रा.आर.डी.पवार, सुखदेव साळुंखे, रविंद्र पाटील, महेश परचंडे, महिपती खरात, शिवाजी पवार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुधीर भोसले, विजय वाघ आदी उपस्थित होते. 

  कार्यक्रमाचे प्रस्ताविक विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा विठ्ठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष विलास साळुंखे व प्राचार्य आर.डी.पवार यांची आपले विचार व्यक्त केले. 

     सोशल डिस्टन्स पाळून हा कार्यक्रम पार पडला. यावेळी औदुंबर अण्णा प्रेमी व हितचिंतक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
Top