मुकुंद जाधवर व सिद्धेश्वर मुंडे या तरुण उमेदवारांचे अर्ज पात्र

मुंबई / पुणे. ( विशेष प्रतिनिधी ) – पुणे पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकुंद जाधवर तर औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांची उमेदवारी, या तरुण उमेदवारांचा अर्ज वैध ठरला असून पदवीधर तरुणांच्या प्रश्नाची जाणीव असलेले तरुण अभ्यासू उमेदवार आहेत.

संपूर्ण राज्यात ५ लाख कंत्राटी कर्मचारी मंत्रालय ते ग्रामपंचायतीपर्यंतच्या सर्व विभागांत काम करत आहेत. त्यात मंत्रालय, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था यातील आस्थापनेवरील कंत्राटी कर्मचारी, मानधनावरील कंत्राटी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी यांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघामध्ये ३.५ लाख कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मुंबई मंत्रालायावर धडक मोर्चा काढणे, नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढणे, नागपूर हिवाळी अधिवेशन मध्ये विधानभवनावर धडक मोर्चा काढणे तसेच विशेष मध्ये मुंबई उच्च न्यायालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी दाद मागे असे अनेक कार्य महासंघाच्या वतीने मुकुंद जाधवर यांनी केले आहे. राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत सर्व शासकीय व निमशासकीय विविध विभागात आस्थापनेवर व कंत्राटदाराकडून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. अशा सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या न्याय देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ करत आहे. तसेच सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या हिताचे शासन निर्णय, परिपत्रक, शासन आदेश आदी साठी मंत्रांकडे सतत पाठपुरावा करणे, अजूनही समान काम, समान वेतन असा मोबदला मिळत नाही,एकीकडे कंत्राटे घेणाऱ्या खाजगी संस्था तर दुसरीकडे सरकारकडून या कंत्राटी कर्मचारी घोर फसवणूक होत आहे.त्या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे पदाधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये आपले प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी कोणतरी वाली निवडणुकीत उभा असल्याने या उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी संपूर्ण ताकदीने प्रयत्न प्रत्येक कंत्राटी कर्मचारी आपले विशेष योगदान देत असल्याचे सूत्राकडून कळले आहे.
 
Top