वादळी वारा :

राजकारणात आरक्षण दुसरा विषय नाही 
मतासाठी दुसरं कांही आता उरलंच नाही !!१!!

जो तो आपल्या खुर्चीखेरीज पहात नाही
देशाच्या संविधानाची चाड नेत्यांना नाही !!२!!

सत्तेत आहेत ते बोलत नाहीत हे खरं आहे 
जे सत्तेत नाहीत ते आंदोलनात हेही खरं आहे !!३!!

संविधान आत्मा फक्त दिन पाळला जातो 
अंमलबजावणी नाही हे कांही खोटं नाही !!४!!

दुरुस्तीवर दुरुस्त्या मूळ संविधान कोठे कोडं आहे 
नेते जोरात सामान्य कोमात खास बाब सत्तेत खरं आहे !!५!!


              जीवन भाष्य :


या जीवनातील प्रत्येक क्षण अमृतमय !
माणसानं समजून घ्यावं 
जगणं म्हणजे पैसा दौलत कमावणे नव्हं 
सुसंस्कृत वागाव,ज्ञानाने समृद्ध व्हावं 
तिन्ही लोकी आपलं नांव कीर्ति स्थान कोरुन जावं !!

आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००


 
Top