लढतो आहोत ......

राजधानीत आमच्याच देशात आम्हांस बंदी ?
कोण हिरावून घेत आहे आमचं स्वातंत्र,
आमचे हक्क आम्ही लाखोंच्या संख्येने
पण अगदी निर्दयपणे अश्रूधुराच्या
नळकांडया फोडल्या जात आहेत
ते आमच्या हक्कावर गदा आणत आहेत
शेतकरी विरोधी कायदे करत आहेत
ब्रिटिशदेखील आता लाजत आहेत
म्हणूनच सत्तेच्या जोरावर आम्हाला
भूमिहीन करत आहेत
आमच्या आक्रोशाला दडपून टाकत आहेत
पण आम्ही पाहतो आहोत गांधींच्या प्रतिमेकडे 
अन लढतो आहोत हिंमतीने
एक विश्वास आहे जे आम्हांस मातीत घालेल त्यांना आम्ही माती दिल्याशिवाय राहणार नाय !!

पुणेरी टोलनाका:


विचार करून वागणारे पुणं आहे
प्रत्येकाच आपलं धुण वेगळं आहे
बोलण्यात मात्र चतुरपण आहे
अंगावर न घेता मुक्त व्हायचं शहाणपण आहे "

आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००


 
Top