विश्वात या मी माझा एकटाच आहे
उर्वरित सारा ज़रूरीपुरता उतारा आहे !!
मायाजाल समुद्र पाणी पिता येत नाही
आपले मरण दुसरा भागीदार होत नाही !!
आपण उपसतो आड श्रमाचे पर्याय नाही
स्वतः जळत राहतो कोणास सूतक नाही !!
मृत्यू शाश्वत कोणासही सुटका नाही
माहीत असूनही माणूस सुज्ञ नाही !!
असो वा नसो देव येथे अधिपती आहे सर्वत्रअंधश्रद्धेचा अग्नी विनाशक आहे !!
ज्ञान घेऊनही माणूस अंध जगतो आहे
सुखाच्या स्वप्नंपूर्तीसाठी धुंद होतो आहे !!
खोड राजकारणाची .....
व्यसनी कुटुंब सोडेल पण,
दारू सोडणार नाही
राजकारणी घरं उध्वस्त करेल पण ,
राजकारण सोडणार नाही
सावकार नातं सोडेल पण ,
व्याज सोडणार नाही
कांहीही करा पण ,
कुत्र्याचे शेपूट सरळ होणार नाही "!!
आनंद कोठडीया,जेऊर ,९४०४६९२२००