पंढरपूर,३०/११/२०२० - सोमवार दिनांक ३०/११/२०२० रोजी कार्तिक शु.१५, त्रिपुरारी पोर्णीमेनिमीत्त पुणे येथील भाविक राजाभाऊ भुजबळ यांच्यातर्फेे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये दिपोत्सव व सुंदर रांगोळी काढण्यात आली होती.
तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातर्फे विनोद पाटील (आस्थापना विभाग प्रमुख) यांच्या हस्ते श्री तुळशी विवाह संपन्न झाला. त्यावेळी मंदिरे समिती सदस्या तथा पंढरपूर नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.


     कोरोना विषाणुचे प्रादुर्भावामुळे शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आज सोमवार दिनांक ३०/११/२०२० रोजी कार्तिक शु.१५, त्रिपुरारी पोर्णीमेनिमीत्त श्री विठ्ठलाच्या पादुकांचे मंदिर प्रदक्षिणा नंतर विधीवत पुजा करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याकरीता आळंदी कडे परंपरेनुसार आज रोजी प्रस्थान करणेत आले व तदनंतर श्रीं च्या पादुका विठ्ठल चौखांबी येथे ठेवण्यात आल्या होत्या .
 
Top