शहिद झालेल्यांचे कुटुंबातील सदस्यांना आधार

पुणे,१७/११/२०२०,(डॉ अंकिता शहा) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.अनेक भागात संचारबंदीची कडक अंमल बजावणीसाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच कोरोना वॉरियर्सचा बंदोबस्त लावण्यात आला होता.या संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये तसेच कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येत होती. मात्र हे सर्व करत असताना कोरोना कालावधीत कर्तव्य बजावत असलेले पोलीस खात्यातील अनेक जण कोरोना आजाराने मृत्यूमुखी पडले.


     त्या पोलीस विभागातील शहिद झालेल्यांचे कुटुंबातील सदस्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचाच एक भाग कोरोना कालावधीत कर्तव्य बजावत असताना कोरोना आजाराने मृत्यूमुखी पडलेले पोलीस उप निरीक्षक रमेश किसन वायकर व पोलीस हवालदार अनिल रामचंद्र जगदाळे यांच्या कुटुंबियांची पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख pune gramin यांनी भेट घेऊन विचारपूस केली व त्यांना दिवाळी फराळ भेट दिला आहे.  आणि या कोरोना योद्धयांच्या कुटुंबातील सदस्यांना आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा विश्वास दिला.
 
Top