महसूल व वन विभाग मदत व पुनर्वसन महाराष्ट्र शासन यांचे आदेशानुसार राज्य शासनाने दिनांक १६ नोव्हेंबर २०२० पासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुले करून दिलेली आहेत. तसे आदेश पारित केलेले आहेत. कार्तिक शुद्ध एकादशी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून यावर्षीही दिंड्या पंढरपूर येथे दाखल होण्याची शक्यता आहे. कार्तिक एकादशी निमित्त देवस्थानात करावयाचे नित्योपचार सीमित मान्यवरांच्या उपस्थितीत व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने सामाजिक अंतर राखून करण्यासंदर्भात सर्व मार्गदर्शक सूचना (sop) चे काटेकोर पालन करून होणार आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून निघणार्या दिंड्या पंढरपूर येथे दाखल होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी असे आदेश शासनाने काढले आहेत.