कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वार्तेने पसरली चिंताकुर्डुवाडी ( राहुल धोका) दि २३/११/२०२०- माढा तालुका व कुर्डुवाडी शहरात गत तीन महिन्यांपासून कोरोनाचे थैमान चालु होते मात्र कोरोना आटोक्यात आला तो येथील नगर पालिका प्रशासन ,ग्रामिण रुग्णालय व खाजगी अद्यावत कोविड सेवेमुळे,परंतु आता पुन्हा कोरोनाने मुसंडी मारली असून त्यामुळे त्यामुळे सेवा क्षेत्रात हि चिंतेचे वातवरण पसरले आहे.

     कोरोनामुळे अनेक डाॅक्टर व वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारीवर्गाला प्राणास मुकावे लागले आहे. नपा स्वच्छता निरिक्षक तुकाराम पायगणसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी कोरोना संक्रमित झाले. ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डाॅ संतोष अडगळे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे शहरात रोज कोविड तपासणी तसेच मोफत तपासणी अभियान चालवली गेली.माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत नागरिकांत जनजागृती करण्यासाठी मोहीम उघडली गेली परंतु आता येणारी दुसरी लाट‌ हि त्सुनामी असणार आहे.

    कोरोनाच्या घसरगुंडीमुळे आज ८०% लोक मास्कविना फिरताना दिसतात. दिवाळी सणात ही गर्दीने संक्रमणात वाढ झाली आहे.आता माध्यमिक शाळा सुरु होत आहेत अशा परिस्थितीत या क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर तसेच कर्मचारी यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मास्कचा वापर लसीप्रमाणे करणे व सोशल डिस्टनसिंग हे दोन प्रभावी उपाय पुन्हा स्विकारावे लागणार असून कोरोनाचा हा राक्षस कायम स्वरुपी नष्ट व्हावा यासाठी नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळून कोरोनाला परतवून लावण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवतील ही अपेक्षा.
 
Top