कोव्हिड नियमांचे अनुपालन करण्यासाठी जनजागृतीचे कार्य मोठे


पंढरपूर,दि.०६ /११/२०२०- Covid-19 या महामारी ची सुरुवात झाल्यानंतर त्याची साखळी तोडण्यासाठी काही आवश्यक गोष्टींचे अनुपालन समाजातील लोकांकडून झाल्यास साखळी तोडणे सुलभ होत असल्याने, त्यास जनजागृती हा उत्तम पर्याय होत असल्याने अशी जनजागृती काव्य मनोरंजन व भित्तपत्रके हे समाज माध्यमाचा उपयोग करून जनजागृती केल्यास प्रभावी ठरणारे असून लघु काव्यात दिलेला संदेश लोकांचे मनात दीर्घकाळ राहत असते हे सूत्र लक्षात घेऊन कोव्हिडं योद्धा ऍड वर्षा गायकवाड व सुप्रसिद्ध साहित्यिक व कवयित्री लता बहिरट या दोघींनी मिळून एक जनजागृतीपर लघु काव्य प्रसिद्ध करून ते द्रुकश्राव्य स्वरूपात कोव्हिडं योद्धा ऍड वर्षा गायकवाड यांनी सादर करून सामाजिक माध्यमाद्वारे प्रसिद्ध केले.

   आज या उपक्रमाचे द्विशतक होत आहे.सातत्याने ओळीने सलग दोनशे दिवस ही लघुकाव्य दृकश्राव्य माध्यमातून प्रसारित केली जात आहेत. त्यामुळे कोव्हिडं नियमाचे अनुपालन करण्यासाठी जनजागृतीचे कार्यात त्यांनी मोठे योगदान केले आहे.

  या द्विशतक महोत्सवाबद्दल सर्वत्र दोघींचे कौतुक होत आहे. विशेषतः पंढरपूरचे नोडल ऑफिसर प्रातांधिकारी सचिन ढोले साहेब व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच पंढरपूरचे पदाधिकारी यांनीसुद्धा दोघींना सर्व जनतेतर्फे धन्यवाद दिले आहेत.  

 याबाबत महामारीचे संकट टळेपावेतो हा उपक्रम सातत्याने चालू ठेवण्याचा मानस सौ. लता बहिरट व ऍड. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे अशी माहिती ऍड बी.ए.बहिरट यांनी दिली.
 
Top