समदं खरं हाय ....

शेतकरी येथे फक्त मतापूरता उतारा आहे
जाईल तिथे भांडवलदारांचा पसारा आहे
शेतकरी उपाशी तर बाकी सर्व तुपाशी
याची खंत कोणाला आहे ?"


माणसा तूच लोभी.... येथे......
(माय नेम इज टुडे ..)

माणसा तूच लोभी सुखाचा अन सन्मानाचा येथे
तूच ज्ञानी चतुर नियोजना स्वार्थाचा येथे !!

याचं मातीत जन्म तुझा देतो माती सर्वाना येथे
नाही जाणीव कोणाची जगणे वांझोटें येथे !!

अपेक्षा अमर्याद , तुझ्या नाही तृप्ती येथे
बेचैन तू मिळवण्या फुकटचा पैसा येथे !!

असूनही शिक्षण उणे संस्कारा तू जीवना येथे
स्वार्थापुढे ठेवतो बुद्धी गहाण बेपर्वा येथे !!

तूच केली मशागत अंधश्रद्धेची येथे
तूच शोषणकर्ता नाही रे गटांचा येथे !!

नाही विधिनिषेध तुजला तूच निगर्गट्ट येथे 
तज्ञ तूच समर्थक तुझ्या विकृतिचा येथे !!

तूच करतो पंचनामा संत महात्मा गुरु यांचा येथे 
पैशा सत्ता जात तुझी हत्यारे शमवण्या विरोध येथे 

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००


 
Top