माय नेम इज टुडे ....

मनांत वेदनाचे काहूर नेत्र आटलें
आलेले भोग माजवू कशाला !!

विद्रोही मी शरणार्थी होऊ कशाला
परंपरेचे ग़ुलाम होत जगू कशाला!

पाय रक्ताळले तरी वाट सोडू कशाला
कितीही प्रहार झाले तरी विसावा कशाला !!

मानपमान शून्य प्रतिष्ठेत गुंतू कशाला
गतीरोधक जागोजागी थांबा घेऊ कशाला !!

आर्थिक ताण संदर्भ बदलू कशाला
अंधारात मशाल विद्रोहाची मालवू कशाला !!

रणांगण विद्रोहाचे युद्धाला भीऊ कशाला !!
सूर्योदय परिवर्तनाचा चिंता कशाला !!

पंचनामा :

कोण गांधीवादी कोण पुरोगामी
कोण प्रस्थापित कोण विस्थापित
कोण चारित्र्य संपन्न कोण भ्रष्ट
कोण श्रेष्ठ हे ठरवणं अवघड आहे
इथे सरडाही लाजतो अशा रंग बदलणाऱ्या
नेत्यांचाच राजकारण एक बाजार झाला आहे त्यांत संधीसाधुंची गर्दी आहे
जो तो मिळेल तेवढं लाटतो आहे
तोच गांधीवादी म्हणून मिरवतो आहे 
हीच खरी शोकांतिका आहे 
लोकशाहीला लागलेली कीड आहे "!!

आनंद कोठडीया,जेऊर
९४०४६९२२००


 
Top