खुर्चीचा पंचनामा .......

राजकारणात युती आघाडी सतत चालू असते
कधी पोळी तर कधी होळी असते
जमलं तर टाळी नाहीतर गोळी मिळते
कांहीच पदरात पडलं नाही तर
मग तोंडात जुन्याच हाडकाची नळी असते 
जेंव्हा सत्ता तेंव्हा कळी खुलते 
जेंव्हा वनवास तेंव्हा मळी वाहते "!!


 गोफण :

लोकशाहीत शिक्षणाची अट नाही 
सही निशाणी अंगठा असला तरी 
अडचण येत नाही ,वारसदार असेल तर 
इतरांना भोई होण्याशिवाय 
काम शिल्लक रहात नाही 
सोयीसाठी कोणतेही टोक गाठले जाते 
नाक कापले तरी भोक दाखवले जाते 
कोणीही असो मिरची झोम्बली तरी 
खुर्ची सोडत नाहीत वेळ येताच एकमेकांना दिगम्बर करायचे सोडत नाहीत "!!

आनंद कोठडीया,जेऊर ९४०४६९२२००


 
Top