पंढरपूर,२३/११/२०२० -राज्यभरातून भाविक पंढरपुरात येत असतात. मात्र नागरिकांना आणि भाविकांना चंद्रभागा chandrabhaga river वाळवंटात सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे .


(छायाचित्रे -संजय माने, पुणे)

     कोट्यवधी रुपये वारकऱ्यांच्या नावावर खर्च करणाऱ्या शासनाने किमान वाळवंट तरी साफ ठेवावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.


      वाळवंट सफाईसाठी मंदिर समितीसह नगर परिषदने लाखो रुपये खर्च केले आहेत. मात्र तरीही वाळवंट साफ दिसत नाही. वाळू चोरीमुळे जागोजागी खड्डे पडले आहेत.या खड्डयांमुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरीही चोरी थांबण्याचे नाव नाही. वाळवंट परिसर स्वच्छ व खड्डेमुक्त राहावा यासाठी अनेक आंदोलने झाली तरीही नदीचे विद्रूपीकरण थांबत नाही.

    त्यामुळे आता सामाजिक संघटना वाळवंटातील स्वच्छतेसाठी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. बघूयात या आंदोलनात अगोदर कोण उडी घेणार.
 
Top