कोरोनावार मात करून आलेले केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले ramdas athawale आणि सौ.सीमाताई आठवले यांचे रिपाइं कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत

मुंबई दि.०८/११/२०२० - रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले आणि त्यांच्या पत्नी सौ. सीमाताई आठवले यांनी १२ दिवस वैद्यकीय उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. आज सकाळी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर बांद्रा येथील त्यांच्या संविधान निवासस्थानी ना. रामदास आठवले यांचे सपत्नीक आगमन होताच रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड आनंद उत्साहात भव्य स्वागत केले.ढोल ताशा संबळच्या तालावर ठेका धरून आणि गुलाब पाकळ्यांच्या पुष्प वर्षावात हर्षोल्हासात ना. रामदास आठवले आणि सौ सीमाताई आठवले यांचे स्वागत करण्यात आले.


केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले व त्यांच्या पत्नी सौ सीमाताई आठवले यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर रिपाइं कार्यकर्त्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. सर्व रिपाइं कार्यकर्ते चिंताग्रस्त होते.गो कोरोनाचा नारा देऊन संपूर्ण जगाला कोरोना विरुद्ध लढण्याची ऊर्जा देणारे ना रामदास आठवले हे कोरोनाला हरवून निश्चित लवकर घरी सुखरूप येतील असा विश्वास कार्यकर्त्यांना होता.

कुमार जित आठवले यांच्यासह सर्व आठवले कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे,महाराष्ट्र युवकाध्यक्ष पप्पू कागदे,रमेश गायकवाड,ऍड.अभयाताई सोनवणे, ऍड.आशाताई लांडगे,जयंतीभाई गडा, जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे,प्रकाश कमलाकर जाधव, सोना कांबळे,रवी गायकवाड,स्वप्नाली जाधव, उषाताई रामळु,सुनील कटारे,दयाळ बहादूर,विवेक पवार,अमित तांबे,चंद्रशेखर कांबळे, घनश्याम चिरणकर ,रतन अस्वारे,आदीनाग रणधीर,विनोद चांदमारे,बाळासाहेब भागवत,अरुण पाठारे,कुणाल व्हाव्हळकर,रमेश पाईकराव,योगेश शिलवंत आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top