मोफत पोलिस प्रशिक्षण,पोलिसांप्रती कृतज्ञता 

    कुर्डुवाडी,(राहुल धोका),०७/११/२०२० - पोलिसांबद्दल अनेकांचा दृष्टिकोन हा नकारात्मक विचाराचाच राहिला आहे.पोलीस हा सतत रागीट, लाचखोर,दया नसलेला म्हणून हिणवला गेला व चित्रफितीतुन अधिक रंगवून लोकांच्या मनात तो तसा बिंबवला गेला हे वास्तव आहे .


 पोलिसांच्या आतमध्येही एक माणूस असतो.तो समाजाची सेवा करत माणुसकीचे दर्शनही घडवत असतो ही बाब कधी समाजाच्या दृष्टिक्षेपास आली नाही. म्हणून पोलीस हा समाजाचाच एक घटक असूनही तो बदनामीच्या जाळीतच अडकून राहिला आहे .


    वर्दीच्या आतमध्ये ही एक माणुसकीचा पाझर असतो हे समाजपुढे आणण्याकरिता कुर्डुवाडी माढा तालुका येथील महाराष्ट्र पोलीस दलात भरती झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार ह्यांनी एकत्रित येऊन 'वर्दीतील माणुसकी' हा सामाजिक उपक्रम सुरू केला असून उपक्रमाचा मुख्य उद्देश पोलिसांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे हा आहे. 

   आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब घटकांना मदत करणे या व्यतिरिक्त वृक्षारोपण सारख्या संकल्पना राबिवणे हा आहे .आतापर्यंत 'वर्दीतील माणुसकी" या उपक्रमातून लॉकडाउन काळात कुर्डुवाडी शहराच्या आजूबाजूच्या वाडीवस्तीवर धान्य वाटप करण्यात आले आहे 

 कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनवर अडकून राहिलेले प्रवासी व गरीब लोकांना ज्या सामाजिक संघटना जेवण देण्याचे काम करीत होत्या.त्यांना धान्य पुरवण्याचे काम केले गेले.वर्दीतील माणुसकीतील काही शिलेदार यांनी वैयक्तिक गरीब लोकांना मदत केली.

   "वर्दीतील माणुसकी"च्या संकल्पनेतून "वृक्ष संवर्धन कुर्डुवाडी" ही चळवळ लोकसहभागातून उभारून काही ठिकाणी वृक्षरोपण करून जतन करण्याचे काम चालू आहे .

    येणाऱ्या पुढील काळात अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्याचा मानस

    देशसेवेसाठी ग्रामीण भागातून आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेली मुले आर्मी भरती व पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत असतात त्यांना गरीब परिस्थितीमुळे शूज व इतर भरती साहित्य , पुस्तके खरेदी करण्यासाठी अडचणी येतात
अशा गरीब होतकरु मुलांना 'वर्दीतील माणुसकी" या समितीच्यावतीने शूज ,टी शर्टसह इतर साहित्य वाटप करण्यात आले.

 याशिवाय शारीरिक चाचणी सरावासाठी मैदान ,डबल बार, सिंगल बार, गोळा फेक मैदान, व्यायाम साहित्य उपलब्ध करून देण्यात आले व त्याना मार्गदर्शन करण्यासाठी शहरातील मार्गदर्शक देण्यात आले .

 लेखी परीक्षेच्या सरावासाठी यशोदीप कलासेसचे वैभव माळी सर यांचे मार्गदर्शन देण्यात येत आहे. गरीब होतकरु मुले जास्ती जास्त भरती व्हावीत त्यासाठी कटिबद्ध राहणे यासाठी मोफत आर्मी/पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र चिंकहील, कुर्डुवाडी या ठिकाणी चालविण्यात येत असून त्याला आजूबाजूच्या परिसरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे 

तरी गरीब परिस्थितील इच्छुक होतकरु मुलांनी संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहनही वर्दीतील माणुसकी या संघटनेकडून करण्यात आले आहे.
 
Top