महर्षी वाल्मिकींच्या जयंतीदिनी कोळी बांधवांचा यल्गार! अर्धनग्न होऊन केला शासनाचा निषेध!!
पंढरपूर,(प्रतिनिधी)- दि. ३१/१०/२०२० रोजी आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी शासकीय लाभापासून वंचीत राहिलेले कोळी महादेव जमात बांधवांनी चंद्रभागेच्या वाळवंटातील महर्षी वाल्मिकी यांच्या मंदिरासमोर अर्धनग्न होऊन आपल्या हातात प्रलंबीत मागण्यांसंदर्भा तील फलक घेऊन शासनाचा निषेध व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आमच्या बर्‍याच वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या मागण्यांचा विचार करुन आम्हाला न्याय द्यावा, असे मत महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेेश अंकुशराव यांनी यावेळी व्यक्त केले. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही येत्या काळात लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करु असा इशाराही त्यांनी दिला.


आपल्या मागण्यांचे फलक हाती घेऊन अर्धनग्न होऊन घोषणा देत महर्षी वाल्मिकी संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे,अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे दिली आहे.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, जयवंत अभंगराव, राहुल परचंडे, प्रकाश मगर, सुरज कांबळे, महेश माने, अक्षय म्हेत्रे, सुनील म्हेत्रे, सुरज नेहतराव, दत्ता अधटराव, रामभाऊ सुरवसे, वैभव माने, किरण वाघमारे, सुखदेव वाघमारे, पांडुरंग अंकुशराव,किसन बळवंतराव, राहुल वाघमारे,शिवाजी पाटील,करण वाघमारे, विकी अभंगराव, दादा छत्रे, पृथ्वीराज हरणे, योगीराज वाघमारे,प्रसाद वाघमारे,पप्पु कोळी, कृष्णा अधटराव,खंडोबा करकमकर,सचिन नेहतराव, ज्योतीराम कोळी, सुरज ननवरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top