कामगारांचा योग्य रितीने सन्मान व्हावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी

पंढरपूर,०५/११/२०२० - अखिल भारतीय सफाई मजदूर कॉंग्रेस संघटना पंढरपूर शाखा यांच्यावतीने दि.२६/१०/२०२० रोजी कर्मचाऱ्यांच्या मागण्यां संदर्भात पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व नगराध्यक्ष यांना मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. या मागण्या अशा आहेत.

दिवाळी सणानिमित्त प्रत्येक कामगारांना ३० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
सातव्या वेतनाचा फरकाचा पहिला हप्ता देण्यात यावा.
कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करावा.
दिवाळी ऍडव्हान्स शासन निर्णयाप्रमाणे १२५०० रू.देण्यात यावा.
सेवानिवृत्त व मयत सेवकांच्या वारसांना त्यांच्या देय रक्कमा द्याव्यात.
महापुरामध्ये गुजराथी कॉलनीमध्ये सफाई कामगारांची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी.
सर्व कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन ऑक्टोंबर पेड इन नोव्हेंबरचे ५ तारखेपर्यंत देण्यात यावेत.
रोनक ठाकूर गोयल यांचे थकीत वेतन मिळणे बाबत अशा मागण्या होत्या.यासाठी दि. ०५/११/ २०२० रोजी संघटनेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धरण्यात आले.त्या अनुषंगाने सर्व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली.

    या विविध मागण्यासंदर्भात पक्षनेते गुरूदास अभ्यंकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, नगरसेवक संजय निंबाळकर, विक्रम शिरसट, निलेश डोंबे, कृष्णा वाघमारे, बसवेश्वर देवमारे, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागनाथ गदवालकर,सोलापूर शहराध्यक्ष बाली मण्डेपू, पंढरपूर शहराध्यक्ष गुरू दोडीया, सचिव महेश गोयल, काशिनाथ सोलंकी, संतोष साळवे, ऍड.किशोर खिलारे, किशोर दंंडाडे, प्रमोद वाघेला, अनिल गोयल, सतीश सोलंकी, संजय कांबळे, विठ्ठल वाघमारे, शरद धनवजीर, सचिन इंगळे, सुमित वाघमारे, धर्मा पाटोळे यांची मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा झाल्यानंतर वरील मागण्या मान्य करण्यात आल्या. त्याचबरोबर तीन मागण्यांविषयी नगराध्यक्षा परगावी असल्याने निर्णय झालेला नाही. परंतु सोमवारपर्यंत कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात निर्णय घेवू असे आश्वासन पदाधिकारी व मुख्याधिकारी यांनी दिले आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये कर्मचाऱ्यांनी आपल्या व कुटूंबाच्या जीवाची पर्वा न करता जोखीम घेवून अहोरात्र शहराची तसेच चंद्रभागा नदीला महापूर आल्यानंतरही सेवा बजावलेली आहे. या कामगारांचा योग्य रितीने सन्मान व्हावा व त्यांची दिवाळी गोड व्हावी. असा निर्णय न झाल्यास कर्मचारी दि. १२/११/ २०२० रोजी संपावर जातील असा इशारा शहराध्यक्ष गुरू दोडीया यांनी दिला आहे.
 
Top