पंढरपूर,(नागेश आदापुरे),०९/११/२०२० - येथील लाड सुवर्णकार समाजाच्यावतीने पंढरपूरचे सदस्य बाळासाहेब किसन इंदापूरकर यांची अखिल भारतीय सुवर्णकार समाज विकास एव शोध संस्था akhil bhartiy suvarnkar samaj Panaji पणजी,पंढरपूर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यानिमित्ताने त्यांचा सत्कार पंढरपूर सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रेय इंदापूरकर,अनिल डहाळे यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी पंढरपूर सोनार कार्यकारणी सदस्यपदी समाधान श्रीपाद भूमकर यांची निवड करण्यात आली.


यानंतर ट्रस्टचे उपाध्यक्ष संजय डहाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी समाजाचे ज्येष्ठ हरिभाऊ इंदापूरकर,भारत अष्टेकर, ज्ञानेश्वर चिंचोळकर ,गणेश इंदापूरकर,औदुंबर आदापुरे, रवी टेंभुर्णीकर, रवी दहिवाळ, मनोज दहिवाळ, माऊली आडणे, सोनार समाजाचे उपाध्यक्ष जगदीश जोजारे आदीसह सर्व समाज बांधव उपस्थित होते.


या निवडीवेळी फिजिकल डिस्टनसिंग व शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश आदापुरे यांनी केले.
 
Top