भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी जयंती निमित्त आयोजित व्याख्यान सत्राच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे दि.१८/११/२०२० - भारताच्या दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांची गुरुवार दि.१९ नोव्हेंबर, २०२० रोजी जयंती आहे. यानिमित्ताने राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने सायं ०५ वाजता "इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल" या व्याख्यान सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान सत्र दुरदृश्य प्रणालीद्वारे (झूम कॉन्फरन्सच्या) माध्यमातून होणार आहे.

या व्याखान सत्राच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे असणार आहेत यावेळी त्यांचे "इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल" या विषयावर अध्यक्षीय भाषण करणार आहेत. या व्याखान सत्रात खा.कुमार केतकर,माजी खा.डॉ. भालचंद्र मुणगेकर, अँड.राज कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे.

ज्या व्यक्तींना या कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी "मॅक्स महाराष्ट्र" या फेसबुक आणि युट्युब चॅनेलवर प्रक्षेपित होणार आहे. या व्याख्यान सत्राच्या अध्यक्ष नात्याने समारोप डाॅ.गोऱ्हे करतील. कार्यक्रम प्रास्ताविक व संयोजन राजीव गांधी स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष गोपाळ तिवारी हे करणार आहेत.
 
Top