पंढरपूर - वारंवार पटवर्धन कुरोली ते पेहे रस्त्यासाठी निवेदन देऊनही दुुुुुर्लक्ष करण्यात येेत होतेे.रस्ता अवस्था अत्यंत खराब झाली होती . गावकरी जीव मुठीत धरुन प्रवास करीत होते.


 त्यामुळे गेेेेल्या सहा दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेेने पटवर्धन कुरोली ते पेहे रस्त्यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते.


अखेर प्रशासनाच्यावतीने प्रत्यक्ष काम सुरु झाले त्यामुळे या उपोषणाची सांगता झाली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक शाहजहानभाई शेख तसेच उपोषणकर्ते कांतीलाल नाईकनवरे,जिल्हा कार्यकारणी सदस्य स्वाभिमानी शेतकरी संघटना,सोलापूर व रामदास मोरे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ जवळेकर उपोषणाची सांगता युवा नेते प्रणव परिचारक, दिनकर नाईकनवरे, प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. 

यावेळी पटवर्धन कुरोली पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते.
 
Top