पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर २०२० रोजी जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज यांच्या 151व्या जयंतीउत्सवा निमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण

नवी दिल्ली,PIB Mumbai,१४/११/२०२० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जैनाचार्य श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराजांच्या १५१ व्या जयंती उत्सवानिमित्त ‘स्टॅच्यू ऑफ पीस’चे अनावरण १६ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता व्हीडियो कॉन्फरन्सिंगद्वारे होईल.

श्री विजय वल्लभ सुरीश्वरजी महाराज (1870-1954) यांनी अत्यंत साधे जीवन व्यतीत करत भगवान महावीरांचा संदेश सर्वत्र पोहोचण्यासाठी निस्वार्थीपणे स्वतःला वाहून घेतले होते. समाजाचे कल्याण, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक दुष्प्रवृत्तींचे उच्चाटन यासाठी अहर्निश काम केले. प्रेरणादायी साहित्य (कविता, निबंध, धार्मिक  स्त्रोत्रे आणि स्तवने) लिहीले तसेच स्वदेशी चळवळ व स्वातंत्र लढ्यातही सक्रीय सहभाग दिला.

  त्यांच्या प्रेरणेने ५० पेक्षा जास्त नामवंत शैक्षणिक संस्था,महाविद्यालये, शाळा आणि अभ्यासकेंद्रे यांच्या स्वरूपात अनेक राज्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याचे नामकरण ‘स्टॅच्यू ऑफ पीस’ असे करण्यात आले आहे. १५१ इंच उंचीचा हा पुतळा अष्टधातूंचा  आहे.अष्टधातू म्हणजे आठ धातूंपासून बनवलेल्या या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये तांबे हा धातू प्रामुख्याने वापरला असून राजस्थानातील पाली जिल्ह्यामधील जैतपुरा येथील विजय वल्लभ साधना केंद्रात या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे.
 
Top