गडकरी यांच्या हस्ते १६ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि उत्तर प्रदेशमधील ७५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा पायाभरणी समारंभ

   नवी दिल्ली,by PIB Mumbai २६/११/२०२०- देशामध्ये जागतिक दर्जाची राष्ट्रीय टोलनाका करारांना मुद्रांक शुल्कातून वगळण्यात यावे अशी मागणी केंद्रिय रस्ते परिवहन, महामार्ग आणि एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेश सरकारकडे केली आहे. काही राज्यात केले जात आहे, त्यानुसार राष्ट्रीय महामार्ग विकासात भू संपादनाचा वेग वाढवावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

   इतर राज्यांनी जसे केले आहे,त्याप्रमाणे साधन सामग्री स्थलांतरण शुल्क निम्मे करून ते पाच टक्क्यांवरून २.५ टक्के करावे,अशी विनंती देखील मंत्र्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या कामांना गती देण्या साठी करण्यात आलेल्या भू संपादनाचा मोबदला देखील तातडीने वितरित केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

   उत्तर प्रदेश येथील एकूण ५०० किलोमीटर लांबीच्या आणि ७४७७ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे (व्हर्च्युअल) आभासी पद्धतीने उद्‌घाटन आणि पायाभरणी समारंभात केंद्रीय मंत्री बोलत होते. 

   गडकरी म्हणाले, गेल्या सहा वर्षांत उत्तर प्रदेश येथे जवळपास ३७०० किलोमीटर लांबीचे ४२००० कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात आले आहेत. आज उत्तरप्रदेशात ११,३८९ किलोमीटर पेक्षा अधिक राष्ट्रीय महामार्ग आणि १.३ लाख कोटी रुपयांची रस्ते बांधणी झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भू संपादनासाठी राज्यामध्ये २६,००० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत,अशी माहिती त्यांनी दिली. राष्ट्रीय महामार्गांची सुधारणा आणि विकास यामुळे सर्व जिल्ह्यांमधील महत्त्वाच्या शहरांमध्ये दळवळण यांचा दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.

    गडकरी म्हणाले, राज्यात सीआरएफच्या कामासाठी २०१४ पासून १५,४३९ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते म्हणाले, मागील वर्षी योजनेअंतर्गत ४६२८ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, तर आणखी २८७ कोटी रुपये चालू वर्षासाठी मंजूर झाले आहेत. आणि आज आणखी २८० कोटी रुपये वितरित करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. राज्या कडून प्रस्ताव मिळाल्यानंतर लगेचच रक्कम वितरित केली जाईल, अशी ग्वाही मंत्र्यांनी दिली.

उत्तर प्रदेशमध्ये २९०० किलोमीटर लांबी असलेले राष्ट्रीय महामार्ग 

मंत्री म्हणाले, चालू वर्षात उत्तर प्रदेशमध्ये २९०० किलोमीटर लांबी असलेले साधारण ६५,००० कोटी रुपये खर्चाचे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार आहेत. अन्य ११०० किलोमीटर लांबीचे आणि १४,००० कोटी रुपयांचे मार्ग या वर्षी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ३५०० किलोमीटर लांबीचे आणि ५०,००० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे अहवाल तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, असे ते पुढे म्हणाले. मंत्री म्हणाले, दोन लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय महामार्गांचे काम उत्तर प्रदेशमध्ये हाती घेण्यात आले आहे.

   केंद्रिय रस्ते परिवहन आणि महामार्ग राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही. के. सिंह (निवृत्त) म्हणाले, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आंतरराज्य आणि आंतरजिल्हा यामधील दळणवळण अधिक जलद, विनात्रासाचे होऊ शकेल आणि राज्याच्या पर्यटन क्षेत्राला बळकटी देण्याच्या दृष्टीने ही एक मोठी प्रगती असेल.
Gadkari asks for exemption of toll plaza agreements from stamp duty, halving the utility shifting charges, speedier land acquisition(LA) for developing NHs, and expediting LA disbursal in Uttar Pradesh


 
Top