जागतिक महिला हिंसाचार विरोधी कृतीच्या स्त्री आधार केंद्राच्या पंधरवड्यातील महिलांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या कार्यक्रमास सुरुवात...

पुणे,२९/११/२०२०- दि.३० नोव्हेंबर२०२० रोजी कौटुंबिक हिंसाचार या विषयावर महिलांना जेष्ठ विधीतज्ञ,माजी सरकारी वकील अँड. उज्ज्वला पवार या मार्गदर्शन करणार आहेत.
 
  गेली अनेक दशके स्त्री आधार केंद्र स्त्रियांच्या समस्या सोडवण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहे.यासाठी स्त्री आधार केंद्रामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, कायमच स्त्री आधार केंद्र काळाची गरज ओळखून समाजहितकारक करण्याचा प्रयत्न करते.  

लॉकडाऊनचे परिणाम,प्रवासावरील बंधने

   जागतिक महिला हिंसाचार विरोधात कृतींची १६ दिवसांची मोहीम स्त्री आधार केंद्र अध्यक्षा डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहे. या मोहिमेचा आरंभ २५ नोव्हेंबर,२०२० आणि समारोप १० डिसेंबर २०२० होणार आहे.जागतिक महिला हिंसाचार विरोधात कृतींची १६ दिवसांची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये लॉकडाऊनचे परिणाम,विहार म्हणजेच प्रवासावरील बंधने,एका जागी - घरी थांबण्याचे निर्बंध,ठराविक व्यक्तींशीच  संवाद - भेटींच्या निर्बंधांमुळे एकाकोपणाचा अतिरेक,आर्थिक अस्थिरता यामुळे कुटुंबातील तणाव वाढलेले आहेत.या सद्यस्थितीत समाजाशी, महिलांशी निगडित खालील विषयांचा उहापोह करून त्याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. 

यात १)कौटुंबिक हिंसाचारात वाढ,
२) संवाद कौशल्य
३) स्त्रियांच्या शोषणाचे अधिक विकृत - रूप
४)वाढलेले बालविवाह
५) ऑनलाइन फसवणूक तथा समाजमाध्यमातील शोषण या पाच प्रश्नांवर काम करणे लक्ष केंद्रित करणे आवश्यक झाले आहे.

   १ ऑक्टोंबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने जगातील देशांच्या संमतीने महिला विषयक समानता - समान संधी व राजकिय इच्छाशक्तीस वेग देण्यास २०२० ते २०३०  कृती दशकाची घोषणा केली आहे.या निर्णयाची स्वागत करुन सरकार व समाजात माहिती करून देऊन कृती होण्यास व्यापक अशा 'कृती दशक २०२०-२०३० प्रबोधन मंच' याची आम्ही स्थापना केली आहे. 

      आपण या मोहिमेत सहभागी होऊन सोमवार दि. ३०/११/२०२० रोजी दुपारी ३:०० ते ५:१५ या वेळेत होणाऱ्या चर्चासत्रात जेष्ठ विधीतज्ञ,पुणे माजी सरकारी वकील अँड.उज्ज्वला पवार यांचे महिलांना कौटुंबिक हिंसाचार या विषयावर मार्गदर्शन होणार आहे,असे आवाहन स्त्री आधार केंद्र विश्वस्त,स्त्री आधार केंद्र यांनी केले आहे. 
संपर्कसाठी - ०२०२४३९४१०३/०४
 
Top