कुर्डुवाडी,(राहुल धोका),१०/११/२०२० - कोरोनामुळे व्यापारी गिऱ्हाईकांच्या प्रतिक्षेत असून अतिवृष्टी त्याचप्रमाणे संजय गांधी,श्रावण बाळ सारख्या योजनेंचे पैसेसुध्दा शासनाने अद्याप लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले नाहीत.दिवाळी चार दिवसावर आली आहे परंतु शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई अजुनही जमा झालेली नाही. कोरोनामुळे प्रचंड मोठी आर्थिक मंदी बाजारात असल्याचे चित्र आहे .

किराणा व्यापारी,कापड व्यवसायिक, इलेक्ट्रॉनिक दुकानांनासुध्दा यंदा काही प्रमाणत मंदी जाणवत आहे .
 
Top