कुर्डुवाडी,(प्रतिनिधी)-कुर्डुवाडी शहरात आज  व्यापारी वर्गाने लक्ष्मी पुजन थाटात करुन दिपावली उत्सव साजरा केला.शहरातील मुख्य बाजार पेठेत यंदाहि दिवाळीत अनेक व्यापारी वर्गाने फटाके उडवले नाहीत.    अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. दुकाना बाहेरील बाजुस अनेक ठिकाणी सुरेख रांगोळी काढण्यात आली होती तर सनई चौघडा वाद्येही पुजाप्रसंगी दुकानासमोर वाजवण्यात येत होते. 


    कापड,किराणा,सराफ पेठात पुजानंतरची आतिषबाजी यंदा ही झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सामाजिक संघटना, नगरपरिषद कुर्डुवाडी यांच्या फटाके न उडवण्याच्या आवाहनाला नागरिकांनी मोठा  प्रतिसाद दिला आहे.

झेंडु फुलाचे भाव गडगडले 


    दसरा सणाला १५० ते २०० रु प्रतिकिलो असलेल्या झेंडुच्या फुलाचे दर मात्र दिपवाळीच्या वेळेस गडगडले होते.५० ते ७० रु प्रतिकिलो दर फुलाना मिळाला आहे.
 
Top