मातोश्री वृद्धाश्रमसारखे उपक्रम नवीन पद्धतीमध्ये सुरु करण्यासाठी शासनात प्रयत्नशील -डॉ नीलम गोर्हेे

पुणे, ०३/१०/२०२०- जनसेवा फाउंडेशनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन १ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने जेष्ठ नागरिक यांच्याबरोबर आज दि.३आँक्टोबरला वेबिनार घेण्यात आला.

या वेबिनारमध्ये बोलताना डॉ.नीलमताई गोर्हे यांनी सुरवातीला सर्व ज्येष्ठ नागरिकांना वंदन करून त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना त्यांच्या कुटुंबात प्रेम व ममता मिळो आणि चांगला आयुष्य लाभो अशी प्रार्थना केली.

ज्येष्ठ नागरिकांना सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानाना सामोरे जावे लागत आहे याची जाणीव सर्वाना आहे .ज्येष्ठ नागरिकांना कोविडच्या कालावधीत वेगळ्या प्रकारची मदत आवश्यक असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामध्ये जे जेष्ठ नागरिक एकल राहतात किंवा ते ज्येष्ठ नागरिक स्वतःच्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत अशा सर्व नागरिकांना मदत आवश्यक असल्याचे कोविड कालावधीमध्ये लक्षात आले.यामध्ये महत्त्वाची जेवणाची व्यवस्था आवश्यक होती.ज्येष्ठ नागरिकांना जेवणाची व्यवस्था करता येणे शक्य आहे. याबाबत जनसेवा फाउंडेशन व इतर ज्येष्ठ नागरिक संघटना यांनी जर सर्वेक्षण करून ज्या जेष्ठ नागरिकांना जेवणाच्या व्यवस्थेची आवश्यकता आहे याची माहिती गोळा केली तर त्यानुसार आपल्याला व्यवस्था करता येईल. यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत असे डॉ नीलम गोर्‍हे यांनी सांगितले. मातोश्री वृद्धाश्रम ही योजना अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली.आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार मातोश्री वृद्धाश्रमाची संकल्पना नवीन पद्धतीने सुरू करणे आवश्यक आहे.अशा पद्धतीचे नवीन मातोश्री वृद्धाश्रम तालुका स्तरावरही असणे आवश्यक असल्याचे दिसते. त्यासाठी शासनाकडे प्रयत्न करत असल्याचे डॉ. नीलम गोर्हे यांनी सांगीतले. ज्येष्ठ नागरिकांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे त्यामुळे त्यांचे प्रश्नही योग्यप्रकारे हाताळणे आवश्यक आहे. मनातील नैराश्‍य घालवण्यासाठी विविध प्रकारचे अध्यात्मिक मेळावे घेणे सर्वांचे प्रबोधनही करणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिक संदर्भातले कायद्या बाबत प्रचार आणि प्रसार करून लोकांच्यामध्ये जागृती करणे हे महत्त्वाचे आहे.ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व प्रश्न मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार ,ना.बाळासाहेब थोरात व संबंधित खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने शासन स्तरावर सोडविण्याच्या हेतूने माझें सर्वतोपरी प्रयत्न असतील असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

या वेबिनरचे उदघाटन राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले.या वेबिनरमध्ये १००० पेक्षा ज्यास्त नागरिक सहभागी झाले होते. डॉ विनोद शहा व डॉ मीना शहा यांचे कार्यही मोलाचे आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन करते असे डॉ नीलम गोऱ्हे म्हणाल्या .
 
Top