विठ्ठल कार्पोरेशन लि म्हैसगावची कामगारांना १५% पगार वाढ

कुर्डुवाडी,(राहुल धोका),१३/१०/२०२० - विठ्ठल कॉर्पोरेशन लि, म्हैसगाव कारखान्याच्या गळीत हंगाम २०२०-२१ च्या तेराव्या रोजी बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ प.पु रामानंद सरस्वती महाराज व प.पु शिवचनानंदजी सरस्वती महाराज,चिंचगाव टेकडी यांच्या शुभहस्ते व बबनदादा शिंदे आमदार माढा, संजयमामा शिंदे, आमदार माढा करमाळा मतदार संघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. याप्रसंगी रणजीत शिंदे,जि.प.सदस्य विक्रम शिंदे, सभापती पंचायत समिती माढा धनराज शिंदे , पंचायत समिती सदस्य वामन उबाळे,सुरेश बागल, सुहास पाटील,आप्पासाहेब उबाळे,बंडू भोसले, संतोष घुले,तानाजी नागटिळक,चंद्रकांत पाटील, विजय पाटील उपस्थित होते.

प्रारंभी सत्यनारायण महापूजा प्रवीण पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ राधिका पाटील यांच्या हस्ते पार पडली. याप्रसंगी यशवंत शिंदे,कार्यकारी संचालक वि.काॅ.ली यांनी गळीत हंगामाच्या नियोजनाबाबत माहिती दिली.त्यावेळी कामगारांना ऑक्टोंबर २०२० पासून १५ % पगार वाढ देणार असल्याचे जाहीर केले.

विक्रम शिंदे यांनी ऊस लागवड धोरण व ऊस तोडणी बाबत मार्गदर्शन केले एकही सभासदाचा ऊस गाळपा अभावी शिल्लक राहणार नाही याची ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री संजय जमदाडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले व आभार प्रदर्शन भारत रोकडे जनरल मॅनेजर यांनी केले .याप्रसंगी मोहन पाटील चिफ इंजिनिअर प्रदीप केदार,चीफ केमिस्ट प्रदीप परकाळे,डिस्लरी मॅनेजर भास्कर गव्हाणे फायनान्स मॅनेजर व ऊस उत्पादक शेतकरी सभासद कर्मचारी उपस्थित होते
 
Top