विठ्ठल काॅरपोरेशनच्या गळीत हंगामास सुरवात

      कुर्डुवाडी,(राहुल धोका)२५/१०/२०२०- म्हैसगाव येथील विठ्ठल कॉर्पोरेशन लि कारखान्याचा १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प.पू रामानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व प.पु शिवचरणानंद सरस्वती महाराज यांच्या हस्ते आमदार बबनदादा शिंदे,माढा यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार माढा करमाळाचे संजय शिंदे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला.

     यावेळी माढा पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे, पोपट गायकवाड ,वामनभाऊ उबाळे,सुहास पाटील,आप्पासाहेब उबाळे,सुरेश मारुती बागल, विक्रम उरमुडे ,दत्तात्रय जगताप, तात्यासो जगताप, पंडित खारे,बाबुराव क्षिरसागर , हनुमंत पांडुळे, पै.चंद्रहास निमगिरे,दादासाहेब पाटील,प्रवीण पाटील, विजय पाटील,मधुकर पाटील,चंद्रकांत पाटील,महादेव उबाळे , व्यंकटेश पाटील,आशिष रजपुत,अरुण काकडे,बबलु कांबळे, बंडू भोसले, बाळासाहेब भोसले ,शहाजी पाटील, तानाजी नागटिळक,धनंजय मोरे,दादा कोल्हे,बापू मारकड, बंडू देशमुख,गणेश बागल,अनिल जगदाळे,शहाजी कोरडकर, विश्वनाथ परबत,शहाजी शिंदे आदी उपस्थित होते.

आमदार बबनदादा शिंदे यांचे सहकार्य करण्याचे आवाहन

यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून घेणेबाबत मार्गदर्शन केले तसेच चालू गळीत हंगामाकरिता कारखान्याचे सभासद शेतकरी,ऊस तोडणी वाहतूकदार व कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.दसरा दिवाळी सण कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून साजरा करावा असे आव्हान केले व या सणांकरता सर्वांना शुभेच्छा दिल्या.

१००/- प्रमाणे दिवाळी सणाकरिता हप्ता जाहिर

याप्रसंगी कारखान्याचे व्यवस्थापक संचालक यशवंत शिंदे यांनी सन २०१९-२० करिता कारखान्यात गाळपास आलेल्या उसाचे प्रति रु १००/- प्रमाणे दिवाळी सणाकरिता हप्ता जाहिर केला.

  प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जमदाडे यांनी केले.आभार जनरल मॅनेजर भारत रोकडे यांनी मानले . सूत्रसंचालन निलेश माने यांनी केले.यावेळी मोहन पाटील चीफ इंजिनिअर,प्रदीप केदार चीफ केमिस्ट ,प्रदिप परकाळे डिस्टलरी मॅनेजर, भास्कर गव्हाणे चिफ फायनान्सीअल  मॅनेजर यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी ,ऊस उत्पादक शेतकरी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
Top