सोलापूर,०७/१०/२०२० - साताऱ्याच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची नियुक्‍ती सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली आहे तर सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांची नगरला बदली झाली आहे. गृह विभागाने (बुधवारी) चार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत .

    भारतीय पोलिस सेवेतील अशोक दुधे यांची रायगडच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्‍ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या जागी अजयकुमार बन्सल यांची नियुक्‍ती साताऱ्याच्या पोलिस अधीक्षकपदी करण्यात आली. जळगावचे सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांची बदली झाली असून त्यांना त्याच ठिकाणी पोलिस अधीक्षक पदी नियुक्‍ती देण्यात आली आहे. अनिल पारस्कर रायगड, निलभ रोहन, सहायक पोलिस अधीक्षक, जळगाव यांची बदली करण्यात आली आहे. परंतु, त्यांच्या पदस्थापने बाबत स्वतंत्र आदेश काढले जातील,असेही गृह विभागाने आदेशात म्हटले आहे. 

पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहावे. तत्पूर्वी, त्यांचा मूळ पदभार सोडावा आणि त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असेही आदेश गृह विभागाने दिले आहेत.
 
Top