भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे देत बेकायदेशीर कपात करत असल्याची तक्रार
   पंढरपूर,२९/१०/२०२०- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मार्केट कमिटीत व्यापारी करत असलेल्या भ्रष्टाचाराबाबतचे पुरावे देत बेकायदेशीर कपात करत असल्याची तक्रार केली त्यानंतर झालेल्या चर्चेत व्यापार्यांनी काही गोष्टींची कबूली दिली.

     मागील काही दिवसांपासून वारंवार पंढरपूर मार्केट यार्ड येथील व्यापाऱ्यांविषयी शेतकर्‍यांच्या अनेक तक्रारी येत होत्या.त्या अनुषंगाने चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात आला.

१) बेकायदेशीर 2% कपात बंद
२) केळीचा लिलाव किलोवर करणे.
३) डाळींब छाटणे, प्रतवारी करणे यात सुधारणा करणे .
४) सर्व शेतीमालाचा दर राज्याच्या इतर मार्केट प्रमाणे मिळताजुळता असावा.
५) संगनमत करून दर पाडणे,लिलाव पुकारणार्या व्यापार्यांनी स्वतः माल खरेदी करणे असे प्रकार बंद करणार.
६) बेदाणा लिलाव करताना बेदाणा उधळुन टाकणे बंद करणे.
७) शेतकर्‍यांना सन्मानजनक वागणुक देणे.
८) रात्री मार्केट कमिटीत लावलेल्या मालावर मोकाट जनावरे ताव मारतात त्यासाठी वाचमन नेमणे.
९) एखाद्याचे लायसन्स सस्पेंड झाल्यानंतर त्या कुटूंबातील कोणालाही परत मार्केट कमिटीत व्यावसाय करण्यासाठी लायसन्स मिळणार नाही.
१०) बाहेरुन खरेदीसाठी येणाऱ्या व्यापार्यांवर जर स्थानिक व्यापारी,आडते,दलाल यांनी दबाव आणला तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार.

 आजच्या मिटींगमध्ये मार्केट कमिटीत जे गैरप्रकार चालत होते, ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुराव्यानिशी समोर आणले. त्यामुळे सभापती दिलीप घाडगे यांनी व्यापाऱ्यांना तंबी दिली आणि शेतकरी संघटनेच्या वरील मागण्या मान्य करत पुढील काळात सर्व व्यापाऱ्यांच्या वागणुकीत सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करणार अशी ग्वाही दिली.

   यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील,शहाजहान शेख,रायाप्पा हळणवर,रणजित बागल,बाहुबली सावले,धनुआबा पाटील, सोमनाथ सुर्वे,साहेबराव नागणे, सचिन बागल, श्रीनिवास नागणे,समाधान गाजरे सर, सचिन ताटे,विक्रांत जगदाळे, दत्तात्रय बागल,पप्पु पाटील आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top