पंढरपूर,२०/१०/२०२०- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी सरकोली येथील बाहुबली सावळे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते देण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना ही शेतकरी,कामगार कष्टकरी वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहे. या संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील बाहुबली सावळे यांच्या कार्याची दखल घेऊन सदर निवड करण्यात आली आहे.


यावेळी बाहुबली सावळे यांनी ग्रामीण भागातील युवा वर्ग , शेतकरी,शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी लढा देऊन संघटनेचे धोरण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले.

यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा युवा अध्यक्ष विजय रणदिवे, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, रायप्पा हळणवर, रणजित बागल विष्णू बागल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top