तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे

पंढरपूर,२९/१०/२०२०- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट,पंढरपूरचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांची प्रकृती उत्तम रहावी या हेतूने पिराची कुरोली (ता. पंढरपूर) मधील जागृत देवस्थान हनुमान मंदिरात नुकताच दुग्धाभिषेक करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे तंत्र शिक्षणाच्या माध्यमातून भविष्य घडविण्यात मोलाचा वाटा उचलणारे स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे हे नुकतेच कोविड चाचणीत पॉझिटिव्ह आले असून त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे आणि संपर्कातील व्यक्तींना चाचणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.हे पाहून डॉ.रोंगे सरांची प्रकृती पूर्ववत ठणठणीत होण्यासाठी मंदिराचे पुजारी राजेंद्र सुतार यांच्या हस्ते पिराची कुरोली येथील कार्यकर्ते व डॉ.बी.पी.रोंगे सर प्रेमींनी हनुमान मूर्तीची विधिवत पूजा करून मूर्तीला दुग्धाभिषेक घातला आणि डॉ.रोंगे सरांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली.

    यावेळी गणेश कौलगे, बळीराम लामकाने, धनंजय कौलगे, बाळकृष्ण कौलगे, मुन्ना मुजावर यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
 
Top