सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग व महर्षी वाल्मिकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी व ईदच्या शुभेच्छा

   पंढरपूर,प्रतिनिधी,दि.३०/१०/२०२०- जिजामाता उद्यान, पंढरपूर येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेचे पूजन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सरचिटणीस सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले.


     यावेळी बोलताना सुनेत्राताई पवार म्हणाल्या, "आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी यांनी संस्कृतमध्ये रामायणाची रचना केली. वाल्याचे महर्षी वाल्मिकी झाले. त्याप्रमाणेच जनतेने वाल्मिकींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात परिवर्तन आणले पाहिजे. "

ओबीसी विभागाच्यावतीने ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा

   ओबीसी विभागाच्यावतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा देण्यात आल्या.सदर कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रांताध्यक्ष प्रमोद मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष समीर कोळी यांनी केले .

  याप्रसंगी पंढरपूर शहर काँग्रेस अध्यक्ष राजाभाऊ भादूले,पीव्हीएनचे संपादक राजकुमार शहापूरकर युवक काँग्रेसचे अभिषेक शहा,सचिव अमित अवघडे ,जिल्हा ब्राह्मण सेलचे अध्यक्ष द.बडवे , अल्पसंख्यांक सेलचे आशपाक सय्यद,महेश जाधव,देवानंद ईरकल,अमर अभंगराव,आदेश आधटराव , पंढरपूर शहर काँग्रेस सरचिटणीस बाळासाहेब आसबे,सोमेश्वर अभंगराव आदी उपस्थित होते.
 
Top