बाराबलुतेदारांना व्यवसायासाठी भूखंडामधून जागा उपलब्ध करून द्यावी -शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे

उपजीविका रचनेतून कुशल कार्य करत राहणाऱ्या हातांना काम मिळेल

पंढरपूर,प्रतिनधी,३१/१०/२०२०-बारा बलुतेदारांना राज्यभर प्रत्येक गावात उद्योगासाठी व राहण्या साठी जागा द्याव्यात कारण आज व्यवसायाला जागा नसल्याने शासनाने भूखंड देणे आवश्यक आहे .ज्यामुळे बारा बलुतेदार विकास काम साधू शकतील.कुशल कौशल्य विकास म्हणजेच देशाच्या सामाजिक सांस्कृतिक कलेच्या माध्यमा तून उपजीविका रचनेतून कुशल कार्य करत राहणाऱ्या हातांना काम मिळेल.  

 वास्तविक बलुतेदारांना शासनाने सांस्कृतिक आधारवर सरळ त्यांच्या क्षेत्राशीच सलग्न कारागीर जातींना निरीक्षणामार्फत मुलाखतीतून कुशल कारागीर म्हणून म्हणून प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.ह्या वर्गांना कोणी वाली नव्हते, प्रतिनिधी नव्हते.उदरनिर्वाहासाठी काम मिळत नाही,हातात पैसा नाही अपेक्षित बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे अशा परिस्थितीत शासनाला देशात पात्रास कोटी कुशल-कौशल्ये हवे आहे,हे कामें शक्य होईल असे शिवस्वराज्य युवा महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे.
 
Top