आम्ही भीक नाही,हक्क मागतोय, गरज पडेल तेव्हा सरकार पाडू - शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे
पंढरपूर,(प्रतिनिधी)-मराठा आरक्षणाच्या मुद्द्या वरून सध्या राजकारण तापलं आहे.मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका,आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत,अशा शब्दांत शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप मुटकुळे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.१९०२ मध्ये शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले.त्यात मराठा समाजाचाही समावेश होता.शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांची स्वराज्याची संकल्पना पुन्हा एकदा प्रस्थापित होणे आवश्यक आहे. ८०टक्के मराठा समाज गरीब आहे.आम्ही भीक मागत नाही हक्काचे आरक्षण मागतो आहोत. आम्हाला आता गृहीत धरु नका,शेवटच्या श्वासा पर्यंत लढत राहणार.आमचे आरक्षण द्या,असेही संदिप मुटकुळे यांनी म्हटले आहे.
 
Top