सरकोली, २२/१०/२०२० - सरकोली गावाला माण व भीमा या दोन्ही नद्यांमुळे बेटाचे स्वरूप आलेले आहे . या पुरामुळे सरकोली परिसरातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील ऊस,केळी,मका,द्राक्षे,डाळिंब,आंबा,पेरु व चिंच या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.


कोरोनामुळे आधिच संकटात सापडलेल्या गावकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठान,सरकोली Shivbhakt Prathisthan Sarkoli यांच्यावतीने आज जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


 याप्रसंगी अध्यक्ष सुधीर कराळे तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटना अध्यक्ष गणेश भोसले, शाळा समिती अध्यक्ष राजाभाऊ भोसले,नंदु आबा भोसले,विलास गायकवाड, ॠशीकेश डिंगरे,भारत कराळे, प्रशांत भोसले, कुमार सावळे आदिसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.


 तसेच शिवभक्त प्रतिष्ठान सरकोली यांच्याचवतीने आज  जवळे येथील शाहीर सुभाष गोंधळी यांना मदत देण्यात आली. 


यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवास भोसले, जिल्हा कार्यकारणी सदस्य बाहुबली सावळे,शाळा समिती अध्यक्ष राजाभाऊ भोसले, मनसे अध्यक्ष पवन बेंदरे, शिवभक्त प्रतिष्ठान अध्यक्ष सुधीर कराळे, विलास गायकवाड व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top