भिमा नदीचा महापुर ओसरल्यापासुन पाण्याच्या टाक्या रिकाम्याचं


  शेळवे , (संभाजी वाघुले),३१/१०/२०२०- मागील १५ दिवसांपुर्वी भिमा नदीला महापुर आला होता. अचानक आलेल्या या संकटामुळे नदीकाठावरील सर्वच विद्युत मोटारी सुरक्षित ठेवल्यामुळे पिण्याच्या पाण्याची व वापरायच्या पाण्याची शेळवे गावात अत्यंत गैरसोय भासत आहे.

   भिमा नदीचा महापुर ओसरुन १५ दिवस होऊन गेलेले आहेत.परंतु शेळवे गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच टाक्या अजुनही रिकाम्याच असून शेळवे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना पाण्याची सोय केलेली नाही.भिमा नदीला अजुनही गुडघा ते मांड्यापर्यंत चिखल आहे.नाईलाजास्तव भिमा नदीच्या चिखलातुन पाणी आणावे लागत आहे. 

   शेळवे गावातील प्रत्येक घराला जनावरे व शौचालयामुळे २०० ते ३०० लिटर पाणी लागत आहे.यामुळे शेळवे ग्रामस्थ गेली १५ दिवस ऐवढे पाणी नदीवरुन व चिखल तुडवत पाणी भरत आहेत.

     भिमा नदीला प्रत्येक वेळी पाणी आल्यानंतर पाणी पुरवठा करणारी विद्युत मोटारीचा बिघाड झालेलाच असतो.त्यामुळे शेळवे पाणी पुरवठा असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झालेली आहे.

    शेळवे गावात बहुतांश लोकांना जनावरे आहेत. यामुळे जनावरांना व घरी वापरायला भरपूर पाणी लागत असते. शेळवे गावातील बहुतांश लोकांनी पाण्याची कमतरता असल्याने शौचालयाला कुलुपे लावून बंद करुन ठेवलेली आहे.

      शेळवे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी वारंवार पाण्याची सोय करावी अशी विनंती करुनही गेली १५ दिवसापासुन टाकीत पाणी नाही.
 
Top