शेळवे येथील शेतीचे पंचनामे अजुनही रखडलेलेच, उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी आदेश देण्याची मागणी     
शेळवे,(संभाजी वाघुले)- शेळवे ता.पंढरपुर येथील शेतीचे पंचनामे अजुनही झालेले नाहीत.भिमा नदीला आलेेला महापुर व कासाळ ओढ्याला आलेल्या पाण्यामुळे तसेच अतिवष्टीमुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती ऊद्धवस्त झालेली आहे.

शेळवे ता.पंढरपुर येथील भिमा नदीचा महापुर ओसरुन आठ ते दहा दिवस झालेले आहेत.परंतु शेळवे येथील शेतीचे पंचनामे करण्यासाठी एकही अधिकारी फिरकलेला नाही.

भिमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतातील पिकांची झालेली नासाडी बाहेर काढावी तर पंचनामे झालेले नाहीत आणि शेतीची मशागत करावी तर पुन्हा पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना पुरावा काय दाखवायचा अशा द्विधा अवस्थेत शेळवे येथील शेतकरी सापडलेला आहे.पुरामुळे शेळवे परिसरातील संपुर्ण शेती पाण्याखाली गेल्यामुळे या परिसरातील ऊस,केळी,मका, द्राक्षे,डाळिंब, आंबा,पेरु व चिंच या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

    महापुराचे पाणी ओसरुन आठ ते दहा दिवस होऊन गेले तरीही आमच्या शेतीचे पंचनामे झालेले नाहीत.पंचनामे कधी होणार,आम्ही शेतीची कामे कधी करणार,असाही प्रश्न शेतकरी वर्गातून विचारला जात आहे.


शासनाकडुन जाहीर केलेली नुकसान भरपाईमध्ये पाऊसाने व महापुराने झालेली पिकांची नासाडी शेतातुन बाहेर काढायलाही पुरत नसल्याचेही शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे.
     शेळवे ता.पंढरपुर येथील संबधीत अधिकारी सांगतात कि मला दुसरे गाव दिलेले आहे.मी त्याच गावात पंचनामे करत आहे.

त्यामुळे शेळवे येथील शेतकरी वर्गातुन शेतीचे सरसकट पंचनामे लवकरात लवकर करुन घेण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना आदेश द्यावेत अशी मागणी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना करण्यात येत आहे.
 
Top