शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान यांचा स्तुत्य उपक्रम

पंढरपूर,(ज्ञानप्रवाह न्यूज),१०/१०/२०२०-आज रोजी शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान shahid major kunal gosavi prathisthan यांचेतर्फे प्रभा हिरा प्रतिष्ठान पंढरपूर संचलित पालवी palavi या संस्थेस गहू ३६० किलो व तांदूळ १२५ किलो देणगी स्वरुपात देण्यात आला.

पालवी संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या अधिक मासातील दानधर्माच्या आवाहनानुसार प्रतिसाद देत शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठान यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवला . येथील बालकांना याचा उपयोग व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम घेण्यात आला .
संस्थेच्या संचालिका डिंपल घाडगे यांनी शहीद मेजर कुणाल गोसावी प्रतिष्ठानच्यावतीने केलेल्या उपक्रमाचे आभार मानले आणि नागरिकांनी संस्थेच्या कार्यात हातभार लावावा म्हणजे आम्हाला पुढील कार्यास आणखी उत्साह येईल असे भावनिक आवाहन केले.
   यावेळी गोसावी कुटुंबातील सर्व सदस्यांनी तेथील मुला-मुलींची आस्थेने चौकशी विचारपूस केली.अधिक मासानिमित्त योग्य ठिकाणी दानधर्म झाल्याचे समाधान वाटले अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमप्रसंगी प्रतिष्ठानचे मुन्नागिर गोसावी, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ वृंदा गोसावी तसेच गोसावी परिवारातील अमित,आशुतोष, विजय, आनंद व महेश म्हेत्रे उपस्थित होते. सदर चा उपक्रम केल्याबद्दल संस्थेच्या प्रमुख मंगलाताई शहा यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
 
Top