लायन्स,लायनेस क्लब व इनरव्हील क्लब पंढरपूर कोव्हीड हॉस्पिटलसाठी सॅनिटायझर स्टँड
पंढरपूर, ११/१०/२०२०-लायन्स,लायनेस क्लब पंढरपूर व इनरव्हील क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोवीड हॉस्पिटलसाठी सॅनिटायझर स्टँड देण्यात आले.


पंढरपूर नगरपरिषद संचलीत ६५ एकर कोविड सेंटर, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर, MIT कोविड सेंटर पंढरपूर या तिन्ही कोव्हीड सेंटरला संस्थेच्या वतीने सॅनिटायझर स्टँड देण्यात आले. लायन्स संस्थेकडून सॅनिटायझर स्टँडचे प्रायोजकत्व पंढरपुरातील बांधकाम व्यावसायिक शार्दूल नलबिलवार यांनी केले.

कोव्हीड कालावधीमध्ये नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल प्रशासनाचे, आशा कर्मचारी यांचे आभार नगीना बोहरी यांनी मानले.यावेळी बोलताना, इनरव्हील संस्था गरजु व्यक्ती,संस्थांना मदत करत असून कोवीड सेंटरसाठी व्हील चेयर देण्यात आल्याचे सांगितले.

अध्यक्ष सुजाता गुंडेवार व पल्लवी माने यांनी कोवीड कामासाठी नगरपालिका कर्मचारी,फिल्ड वर काम करणारे कर्मचारी,सफाई कर्मचारी,नागरी हिवताप विभागाचे कर्मचारी व आशा कर्मचारी यांचे आभार मानले व लायन्स,लायनेस संस्थच्या वतीने कोवीड काळामध्ये गरजुंना, प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार मदत केली आहे व यापुढेही मदत करणार असे सांगितले.

नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांनी कोणतीही स्पर्धा न करता लायन्स संस्था व ईनरव्हील संस्था एकत्रीत येऊन काम करत असल्याने दोन्ही संस्थेचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले.

आरोग्य सभापती विवेक परदेशी यांनी सांगितले की आपल्या गावातील नेमकी गरज शोधुन फिल्डवर जाउन ती पुर्ण करण्याचे काम लायन्स संस्था व ईनरव्हील संस्था करत असून त्यांचा मोठा आधार गरजवंतांना आहे .

मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर,तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले,डॉ प्रदिप केचे,उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, डॉ प्रसन्न भातलवंडे यानीं लायन्स, लायनेस संस्था व इनरव्हील संस्थेचे आभार मानले .

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला.ललिता कोळवले यांनी केले . आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी यांनी आभार मानले .

    कार्यक्रमासाठी इनरव्हील क्लबच्या संस्थापिका नगीना बोहरी,लायन अध्यक्षा डॉ.सुजाता गुंडेवार, लायनेस अध्यक्षा डॉ.पल्लवी माने, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ रानगट,विवेक गुंडेवार,रा.पां. कटेकर,कैलास करंडे,शार्दूल नलबिलवार, इनरव्हील सेक्रेटरी वैशाली काशिद ,आशा गटप्रवर्तक अपेक्षा कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
 
Top