लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या नामफलकाचे उदघाटन समारंभ
 

पंढरपूर, २५/१०/२०२०- साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी जागा मिळावी म्हणून अनेक दिवसांपासून पुतळा समिती ने आमदार प्रशांत परिचारक यांच्याकडे मागणी केली होती त्यास अनुसरून आमदार प्रशांत परिचारक यांनी जागा उपलब्ध करून देण्याबाबत नगराध्यक्षा व नगरसेवक यांना सूचित केले होते. त्यानुसार नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांनी एकमताने दि १ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भक्ती मार्गावरील जागा देण्याचा ठराव मंजुर केला. या जागेवर आज साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे पुतळा नियोजित पुतळा व स्मारक नामफलकाचे उदघाटन समारंभ आमदार प्रशांत परिचारक यांचे शुभहस्ते नगराध्यक्ष सौ. साधनाताई नागेश भोसले यांचे अध्यक्षतेखाली माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले ,उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पक्षनेते गुरुदास अभ्यंकर , नगरसेवक कृष्णा वाघमारे, बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट,आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, नगरसेवक संजय निंबाळकर,राजू सर्वगोड,सुप्रिया डांगे,अंबादास धोत्रे,माजी नगरसेवक इब्राहिम बोहरी,रमेश कांबळे सामाजिक कार्यकर्ता बसवेश्वर देवमारे,नवनाथ रानगट,नरेद्र डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. 


   यावेळी साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे पुतळा समितीचे पदाधिकारी व समाज बांधव नानासाहेब वाघमारे, दिलीप देवकुळे, माजी नगरसेवक महेश साठे ,भगवान यादव ,नाईक रणदिवे,किशोर खिलारे,श्रीकांत कसबे,माजी नगरसेवक रमेश कांबळे या पदाधिकार्यांकडे नगरपरिषदेने केलेल्या ठरावाची प्रत या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आली .या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केले होते.

 यावेळी बोलताना आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले की,गेल्या अनेक वर्षापासून साहित्यरत्न आणाभाऊ साठे यांचा पुतळा बसवावा अशी मागणी होती त्यानुसार आज नगरपरिषदेने साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा व स्मारकांसाठी ४ गुंठे जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरात लवकर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांचा भव्य पुर्णाकृती पुतळा व स्मारक उभा करावे व यामध्ये कोणतेही राजकरण न करता स्मारकाचे काम लवकरात लवकर पुर्ण होईल या दृष्टीने प्रयत्न करावेत. या स्मारकासाठी लागणारी सर्वोतोपरी मदत निश्चितपणे केली जाईल असे आश्वासन दिले.

    यावेळी नगराध्याक्षा साधनाताई भोसले, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नगरसेवक कृष्णा वाघमारे यांनी केले. या कार्यक्रमासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top